‘अलमट्टी’ 99 टक्के भरले, 1 लाख क्यूसेक विसर्ग | पुढारी

‘अलमट्टी’ 99 टक्के भरले, 1 लाख क्यूसेक विसर्ग

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा पाण्याची आवक वाढल्यामुळे अलमट्टी धरण आता 98.85 टक्के भरले आहे. पाण्याचा विसर्ग एक लाख क्यूसेकच ठेवण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याील धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी करून पाणी अडवण्यात येत
आहे.

अलमट्टी धरणाची क्षमता 123.01 असून, सध्या या धरणात 121.606 टीएमसी पाणी आहे. हे धरण आता 98.85 टक्के भरले आहे. या धरणात पाण्याची आवक 1 लाख 16 हजार 168 क्युसेक होत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी हे धरण 92 टक्क्यापर्यंत भरले होते. मात्र, कृष्णा नदीला पूर आल्यामुळे तब्बल सव्वा दोन लाखापर्यंत विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यामुळे पाण्याची टक्केवारी 85 पर्यंत खाली गेली होती.गेल्या तीन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग कमी केलाने आता धरण 99 टक्के भरले आहे.

‘घटप्रभा’मध्ये 48 टीएमसी पाणी
घटप्रभा धरणाताही पाणीसाठा आता 48.530 टीएमसी झाला असून, या धरणाची क्षमता 51 टीएमसी आहे. या धरणामध्ये पाण्याची आवक 8हजार 989 क्यूसेक होत असून, विसर्ग 4 हजार 974 क्यूसेक ठेवण्यात आला आहे.

‘मलप्रभा’मध्ये 31 टीएमसी पाणी
मलप्रभा धरणामध्ये 31.734 टीएमसी पाणीसाठा असून, याची क्षमता 37.731 टीएमसी आहे. या धरणात पाण्याची आवक 4 हजार 369 क्यूसेक होत असून, विसर्ग 994 क्यूसेक ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button