बेळगाव : जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमाल जप्त; चंदगड पोलिसांची कारवाई | पुढारी

बेळगाव : जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमाल जप्त; चंदगड पोलिसांची कारवाई

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेळगाव तालुक्याच्या सीमेपासून जवळ असणाऱ्या तडशिनहाळ ( ता.चंदगड) येथे जुगार अड्ड्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकला. उचगाव (ता. बेळगाव) येथील अँतोन रुजाय फर्नांडिस याच्याकडून १ लाख ६ हजार रुपयांसह एक मोबाईल जप्त केला. याशिवाय जुगार अड्डा चालवण्यासाठी मदत करणाऱ्या विलास कलाप्पा पाटील (रा. शिनोळी खुर्द, चंदगड), राजाराम विष्णू पाटील (रा. तडशिनहाळ, चंदगड) यांच्यावर चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल आनंद देसाई व विनायक सुतार यांनी ही कारवाई बुधवारी सायंकाळी केली. तडशिनाळ येथे कालवा नावाच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुगार अड्डा सुरू केला होता. यावेळी संशयित आरोपीकडून १ लाख ६ हजार ५८० रुपयांच्या रोख रक्कमेसह मोबाईल असा १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी या आरोपींनी बेकायदेशीरपणे लोकांकडून पैसे घेऊन जुगार सुरू केला होता. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी मोक्का कायद्याअंतर्गत जुगाऱ्यावर कारवाई करून जरब बसवली होती. मात्र, आता पुन्हा बेळगावच्या मोरक्याकडून चंदगडमध्ये जुगारी अड्डे सक्रिय होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Back to top button