बेळगाव : हालात्री नदीचा पूल पाण्याखाली, ३५ गावांचा संपर्क तुटला (व्हिडिओ) | पुढारी

बेळगाव : हालात्री नदीचा पूल पाण्याखाली, ३५ गावांचा संपर्क तुटला (व्हिडिओ)

खानापूर : पुढारी वृत्तसेवा; खानापूर (जि. बेळगाव) तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनमोड मार्गे गोव्याला जोडणाऱ्या हेमाडगा राज्य मार्गावरील हालात्री नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे ३५ गावांचा संपर्क तुटला आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेली संततधार आज (गुरुवारी) सकाळपासून कायम आहे. पश्चिम भागातील कणकुंबी, जांबोटी, आमगाव, चापोली, हेमाडगा या परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.

खानापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मणतुर्गा गावाजवळून वाहणाऱ्या हालात्री नदीवरील पुलावर आज सकाळी एक फूट पाणी पातळी होती. त्यानंतर पाणी पातळीत सातत्याने वाढ होऊन सकाळी दहाच्या सुमारास तीन फूट इतके पाणी चढले होते. त्यामुळे धोका टाळण्यासाठी खानापूर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा रस्ता वाहतुकीला बंद केला आहे. सध्या पुलावर दोन पोलीस कर्मचारी तैनात ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

हे ही वाचा :

Back to top button