बेळगाव : पाऊस आला, चला बटाटे लागवडीला!; कडोली भागात लगबग | पुढारी

बेळगाव : पाऊस आला, चला बटाटे लागवडीला!; कडोली भागात लगबग

कडोली : पुढारी वृत्तसेवा:  बटाटा लागवडीच्या हंगामाला तालुक्यात प्रारंभ झाला आहे. परंतु बियाणांचा दर तीन हजार रुपयांच्या टप्यावर गेल्याने शेतकर्‍यांना फटका बसला आहे. बियाण्यांची तजवीज करताना कसरत करावी लागत आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात बटाटा लागवड करण्यात येते. तालुक्याच्या उत्तर आणि पश्‍चिम भागात बटाटा लागवडीचे क्षेत्र अधिक आहे. मध्यंतरी उत्पादन कमी मिळत असल्याने शेतकर्‍यांनी बटाटा लागवडीकडे पाठ फिरविली होती. सध्या बटाटा लागवडीला पोषक वातावरण आहे.

यामुळे शेतकरी बटाटा लागवडीमध्ये गुंतला आहे. बटाटा लागवडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतून बटाटा बियाणांची शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येते. त्याचबरोबर काही प्रमाणात स्थानिक बटाट्यांचाही वापर करण्यात येतो. सध्या बियाणाचा दर महागा आहे. तीन हजार रुपये क्विंटल दराने बियाणे मिळत आहे. त्याचबरोबर खतदरातही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे.

कडोली परिसर

कडोली परिसरात मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड करण्यात येते. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने बटाटा लागवडीला जोर आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास बियाणे कुजण्याचा धोका असतो. त्यामुळे लागवडीला प्राधान्य देण्यात येत आहे. उचगाव भागात लागवड क्षेत्र कमी झाले असून शेतकरी रताळी लागवडीला प्राधान्य देत आहेत.

खर्च वाढला

बटाटा लागवडीसाठी अधिक प्रमाणात गुंतवणूक करावी लागत आहे. बियाणे, खतांचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर त्यानंतर पिकांवर करावी लागणारी कीटकनाशकांची फवारणी महागडी ठरत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे बटाटा लागवडीच्या क्षेत्रात प्रत्येक वर्षी घट होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button