कर्नाटक : 71 रेल्वे स्थानकांत वस्तू प्रदर्शन, विक्री | पुढारी

कर्नाटक : 71 रेल्वे स्थानकांत वस्तू प्रदर्शन, विक्री

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : नैऋत्य हुबळी रेल्वे विभागातंर्गत येणार्‍या 71 रेल्वे स्थानकांमध्ये एक रेल्वे स्टेशन, एक उत्पादन प्रदर्शन व विक्री मोहिम राबवण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे स्थानकाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हुबळी रेल्वे विभागातंर्गत येणार्‍या बेळगाव, धारवाड, गदग, बागलकोट, विजापूर, कोप्पळ, विजयनगर, गोवा, महाराष्ट्रातील सोलापूर आदी जिल्ह्यतील सुमारे 71 रेल्वे स्थानकांमध्ये वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री ठेवण्यात येणार आहे.

या स्थानकामध्ये स्थानिक कृषी उत्पादने, कपडे, हातमाग, स्वयंसेवी बचत गटांनी तयार केलेले खाद्य पदार्थ, वस्तू, मसाल्याचे पदार्थ, फळे, भाजीपाला, शोभेच्या वस्तू आदींचे प्रदर्शन आणि विक्री करता येणार आहे. यासाठी रेल्वे स्थानकात जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 15 दिवसासाठी असणार आहे. सध्या याची अंमलबजावणी हुबळी रेल्वे स्टेशनमध्ये सुरु करण्यात आली आहे.
यासाठी 1 हजार रुपये शुल्क असून, इच्छुकानी रेल्वे स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button