‘परिवहन’च्या ताफ्यात येणार 50 ई- बस | पुढारी

‘परिवहन’च्या ताफ्यात येणार 50 ई- बस

बेळगाव पुढारी वृत्तसेवा : डिझेल दरवाढीला पर्याय म्हणून 50 इलेक्ट्रिक बस परिवहन महामंडळ ताफ्यात दाखल होणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर या बस तीन महिन्यांत रस्त्यावर धावणार आहेत. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर भविष्यात इलेक्ट्रिक
बसची संख्या वाढवण्यात येणार आहे.

राज्यात प्रदूषणविरहीत व डिझेल पेट्रोल दरवाढीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चॅर्जिंग सेवा देण्यासाठी हेस्कॉमने पुढाकार घेतला आहे. पेट्रोल व डिझेल पंपाप्रमाणे चॅर्जिंग पॉईंटची सोय उपलब्ध होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे बसप्रवास महागण्याची शक्यता आहे. परिवहन महामंडळाने अजून तिकीट दरात वाढ केलेली नाही. मात्र, भविष्यात तिकीट दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्याय म्हणून इलेक्ट्रिक बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. इलेक्ट्रिक बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करून आढावा घेण्यात येणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी झाल्यास बसची संख्या वाढणार

 

हेही वाचा

Back to top button