शासकीय तक्रारींसाठी आता त्रयस्थ अधिकारी | पुढारी

शासकीय तक्रारींसाठी आता त्रयस्थ अधिकारी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक, भूमि अभिलेख विभागातील उपअधिक्षक, नगरभूमापन अधिकारी यांच्या कार्यालयातील कामकाजा संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास त्रयस्थ तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त (महसुल) यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

आपले सरकार पोर्टल अथवा इतर माध्यमातून नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक, मुद्रांक जिल्हाधिकारी, भूमि अभिलेख विभागातील उपअधिक्षक, जिल्हा अधिक्षक या कार्यालयांच्या कामकाजाविषयी अर्ज, तक्रार अथवा सूचना आल्यास या तक्रारींचे निरसन करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्य बैठकीत तक्रार निवारण अधिकारी नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार महसुल व वन विभागाचे सहसचिव श्रीधर डुबे पाटील यांनी हे आदेश काढले आहेत.

हेही वाचा

रत्नागिरी : गंगा आगमनानंतर पाऊस लांबल्याची प्रचिती

धोकादायक वीजयंत्रणेची माहिती द्या व्हॉट्सअ‍ॅपवर; महावितरणचे आवाहन

देशातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; २४ तासांत १३,२१६ नवे रुग्ण, २३ मृत्यू

Back to top button