कर्नाटक विधान परिषद निकाल : शिक्षकांची १८०० मते ठरली अवैध | पुढारी

कर्नाटक विधान परिषद निकाल : शिक्षकांची १८०० मते ठरली अवैध

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सुशिक्षित समाज घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांनीच मतदानात अनेक मोठ्या चुका केल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीपैकी पश्चिम शिक्षक मतदारसंघातील 1200 शिक्षकांची तर वायव्य शिक्षक मतदार संघातील सुमारे 600 शिक्षक मतदारांची मते अवैध ठरली आहेत.

प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबवूनही मतदान करताना शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात चुका केल्या. प्राधान्यक्रमानुसार मते देण्याची मतदान प्रक्रिया होती. त्यासाठी देवनागरी, इंग्रजी किंवा कन्नड भाषेत आकडे लिहायचे होते. हस्ताक्षर वापरण्यास बंदी असताना अनेक शिक्षकांनी मतपत्रिकेवर अक्षर रूपात आकडे लिहिले. अनेक शिक्षकांनी मतपत्रिकेवर बरोबर अशी खूण केली आहे. तर काहींनी अनावश्यक ठिकाणी सह्या केल्या आहेत. स्वतःचा पेन काही शिक्षकांनी वापरला आहे. निवडणूक अयोगाच्या नियमांच उल्लंघन केलेली पश्चिम शिक्षक मतदारसंघातीन 1 हजार 223 मते अवैध ठरली आहेत. तर वायव्य शिक्षक मतदार संघातील 600 हून अधिक मते अवैध ठरली आहेत.

वायव्य शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी दुसऱ्या फेरीअखेर 1700 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार अरुण शहापूर पिछाडीवर पडले असून 21 हजार पैकी दुपारपर्यंत 10 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button