s.s.c result : बेळगाव जिल्ह्यातील सहा विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण | पुढारी

s.s.c result : बेळगाव जिल्ह्यातील सहा विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेळगाव जिल्ह्यात सहा विद्यार्थ्यांनी (s.s.c result) पैकीच्या पैकी गुण घेतले असून त्यापैकी दोन विद्यार्थी बेळगाव शहरातील आहेत, अशी माहिती बेळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी बसवराज नलतवाड यांनी दिली. राज्यामध्ये १४६ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेतले आहेत.

सौंदत्ती तालुक्यातील सहना महांतेश रायर या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवले आहेत. सहनाच्‍या वडिलांचे  किराणा मालाचे दुकान असून,  ती कर्नाटक पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे.

सहना महांतेश नायर (केपीएस सतीगिरी ता. सौंदती), स्वाती सुरेश तोलगी (संगोळी रायान्ना मेमोरियल स्कूल, नंदगड ता. खानापूर), आदर्श बसवराज हलभावी (केंब्रिज इंग्लिश मीडियम स्कूल, रामदुर्ग), अमोघ एन कौशिक ( हेरवाडकर स्कूल, बेळगाव), रोहिणी गौडर (बसवेश्वर इंग्रजी माध्यमिक हायस्कूल, रामदुर्ग), व्यंकटेश योगेश डोंगरे (के एल एस इंग्लिश मीडियम स्कूल, बेळगाव) या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेतले आहेत.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button