देवतारी त्‍याला कोण मारी… चिमुकलीने दिवस-रात्र अनुभवले ‘जंगल बुक’ | पुढारी

देवतारी त्‍याला कोण मारी... चिमुकलीने दिवस-रात्र अनुभवले 'जंगल बुक'

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा

चापोली गावच्या मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रम समारंभात गावातील दोन वर्षांची बालिका अचानक बेपत्ता झाली. तब्‍बल चार दिवस या चिमुकलीचा कुटुंबीयांकडून तसेच गावकऱ्यांकडून शोध सुरू होता. दरम्‍यान, चार दिवसानंतर ही दोन वर्षांची चिमुकली घनदाट जंगलात सुखरूप अवस्‍थेत नातेवाईकाना आढळून आली. आदिती शिवाजी हणबर (वय 2) मुळगाव तावर कट्टी असे तिचे नाव आहे. दाेन वर्षांची चिमुरडी चार दिवस एकटी घनदाट जंगलात राहिली. अनुभवले. या जंगलात अनेक वन्य श्वापदे असून आदिती सुखरूप सापडल्‍याने तिच्‍या पालकांसह गावकऱ्यांतून आनंद व्यक्‍त करण्यात येत आहे.

चापोली येथील ग्रामदेवता सातेरी मंदिराचा उद्घाटन समारंभ (सोमवार व मंगळवार) संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सापळी गावच्या गवळी वाड्यातील वसंत हणबर यांची मुलगी सुनीता हणबर या आपल्या माहेरी यात्रेनिमित्त आल्‍या हाेत्‍या.  सोमवार व मंगळवार दोन दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद पार पडला. या कार्यक्रमासाठी पूर्वतयारी करून मंदिराकडे जाण्याच्या तयारीत असतेवेळी अचानक ही दोन वर्षाची आदिती बालिका बेपत्ता झाली होती. या मुलीचा शोधाशोध केला असता ती कुठेही आढळून आली नाही.

दाेन दिवस पावसाचे थैमान

दोन दिवसात पावसाने थैमान घातले होते. अशातच तिचा पत्ता लागत नव्हता घरातील सर्व घाबरून गेले होते. अशातच दोन दिवस जंगल परिसरात शोधाशोध केली असता शनिवारी 30 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान छोट्या बालकाचा रडलेला आवाज ऐकु आला. या ठिकाणी पाहणी केली असता, कुमारी आदिती आढळून आली. हे ठिकाण गावापासून एक किलोमीटर अंतरावर होते.

अखेर आदिती सापडली…

जवळ जवळ चार दिवसाच्या शोध मोहिमेनंतर ही आदिती आढळून आली. चार दिवस सुरू असलेल्या पावसात भिजत आणि तेही जंगल परिसरात बालिका आढळून आल्याने ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्काच बसला. या चार दिवसाच्या काळात या मुलीला डासाने संपूर्ण अंगावर चावले होते. या जंगलात मोठ्या प्रमाणात जनावरांचा वावर असतो. अशातही बालिका सुखरूपपणे सापडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.

हेही वाचा : 

Back to top button