अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात १७ कोटी जमा होणार : जिल्हाधिकारी नितेश पाटील

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात १७ कोटी जमा होणार : जिल्हाधिकारी नितेश पाटील

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानंतर एकूण 11 हजार 234 शेतकर्‍यांच्या खात्यात 17 कोटी 1 लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

यंदा  जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात मका, कापूस, सूर्यफूल, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने महसूल, कृषी व फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त सर्वेक्षण करून तत्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

संयुक्त सर्वेक्षणाच्या आधारे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात येत आहे. बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

logo
Pudhari News
pudhari.news