बेळगाव : लग्न सोहळ्यात माजी सैनिकाचा हवेत गोळीबार | पुढारी

बेळगाव : लग्न सोहळ्यात माजी सैनिकाचा हवेत गोळीबार

चिकोडी, पुढारी वृत्तसेवा : लग्न सोहळ्यात माजी सैनिकाने हवेत गोळीबार केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील एलिमुनोळी येथे घडली आहे. याप्रकरणी सदर माजी सैनिकाला हुक्केरी पोलिसांनी अटक केली आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, हुक्केरी तालुक्यातील एलीमुनोळी गावात अयाज मलिक तहसिलदार यांच्या घरी लग्न समारंभ होता. या लग्नास आलेले माजी सैनिक रफीकसाब तहसिलदार यांनी आपल्या पिस्तुलीतून पाच राउंड गोळ्या हवेत झाडल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. लायसन्स नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हुक्केरी पोलिसांनी महमद रफीक तहसिलदार याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचलतं का?

Back to top button