कर्नाटक : गृहमंत्री शहा १ एप्रिलला कर्नाटकात; मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी

कर्नाटक : गृहमंत्री शहा १ एप्रिलला कर्नाटकात; मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी

बंगळूर: पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरु केली असून लवकरच दिल्ली दौरा करणार आहेत. याकरिता इच्छुकांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1 एप्रिलला कर्नाटक दौर्‍यावर येत असल्याने प्रदेश भाजप नेत्यांनमध्ये उत्साह वाढला आहे. तर माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी तातडीने दिल्ली दौरा हाती घेतला आहे. राज्यातील भाजप सरकारचा कार्यकाळ केवळ वर्षभराचा राहिला आहे. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्याची तयारी सुरु झाली आहे. शिवाय मंत्रिमंडळ विस्तारासाठी अमित शहा राज्यात येत आहेत. वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत.

पाडव्यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार

पाडव्यानंतर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. 1 एप्रिल रोजी अमित शहा कर्नाटकात येत आहेत. त्याचवेळी मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब होणार आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news