Belgaum Accident : बेळगावच्या दांपत्यासह तिघे ठार, सीसीटीव्हीत अपघाताचे दृश्य

Belgaum Accident : बेळगावच्या दांपत्यासह तिघे ठार, सीसीटीव्हीत अपघाताचे दृश्य
Published on
Updated on

चित्रदूर्ग ; पुढारी वृत्तसेवा : टोलनाक्याजवळ थांबलेल्या टँकरला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील तिघेजण जागीच ठार झाले. हे तिघेही बेळगावचे रहिवाशी असून, त्यामध्ये एका दांपत्याचा समावेश आहे. तस तिसरा मृतही त्याच कुटुंबातील आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चित्रदुर्ग जिल्ह्यातील गुयल्याळू टोल नाक्यावर गुरूवारी सकाळी हा अपघात घडला. (Belgaum Accident)

रमेश श्रीनिवास शानभाग (वय 66) त्यांची पत्नी सीमा रमेश शानभाग (62) व विश्‍वनाथ शानभाग (सर्वजण रा. प्लॉट नं. 33 पारिजात अपार्टमेंट, सुभाषनगर, बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत.

शानभाग कुटुंब बंगळूरला गावी चालले होते. बेळगावातून पहाटेच्या वेळी ते निघाल्याचे सुभाष नगरातील स्थानिक रहिवाशांनी सांगितले. चित्रदूर्ग जिल्ह्यातील गुयल्याळू टोलनाक्यावर ते पोहोचले, पण मोकळ्या रस्त्यावरून कार जशी भरधाव धावते, तशीच ती धावत समोर टोल भरत असलेल्या टँकरच्या (केए-01 एएम-0304) खाली घुसली. यामध्ये चालकासह तिघेही जागीच ठार झाले.

Belgaum Accident : सीसीटीव्हीत अपघाताचे दृश्य

अपघाताचे द‍ृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. टोलनाक्यावर एकेक वाहने येत आहेत. ज्या लेनमध्ये अपघात झाला, त्या लेनमध्ये आधी एक ट्रक पुढे जातो. त्याच्या पाठीमागून टँकर येतो. यानंतर एक कार येते ती कार टँंकरच्या डाव्या बाजूच्या लेनमध्ये जाते. तर त्यानंतर काही सेकंदांनी भरधाव आलेली शानभाग यांची कार (केए-22 पी-0362) टोल भरून निघत असलेल्या टँकरच्या पाठीमागे धडकते. ही बाब टँकरचालकाच्या अजिबात लक्षात येत नाही. तो तसाच पुढे जात असताना टोल नाक्यावरील कर्मचारी त्याला हात करून थांबवतात.

भीषण अपघात

अपघातानंतर घटनास्थळाचे दृश्य इतके भीषण होते, की वाहने जाण्यासाठी असणारी ही लेन काही काळासाठी बंद करावी लागली. अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला. शिवाय कारचे अनेक भाग बाजूला फेकले गेले.

चालकाच्या बाजूला असलेल्या व्यक्तीचा मृतदेह काढण्यासाठी पोलिस व त्यांच्या सहकार्‍यांना कसरत करावी लागली. टँकरमध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलवावा लागला. चित्रदुर्ग पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. हे वृत्त बेळगावात येऊन धडकताच सुभाषनगर येथील शानभाग कुटुंबाचे नातेवाईक चित्रदुर्गला रवाना झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news