काळजी घ्या ! देशात उष्णतेची लाट; राज्यातील ‘हा’ भाग देशात सर्वात उष्ण

काळजी घ्या ! देशात उष्णतेची लाट; राज्यातील ‘हा’ भाग देशात सर्वात उष्ण
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भरदुपारी १ ते ३ या वेळेत घराबाहेर जात असाल, तर सावधान. कारण, राज्यात सर्वत्र या वेळेत देशात सर्वाधिक तीव्र अशी उष्णतेची लाट सुरू झाली आहे. मंगळवारी (दि. २६) दुपारी ३ वाजता जळगाव देशात सर्वाधिक ४५.३, तिरोडा ४४.५, तर अकोला ४४.२ अंशांवर पोहोचले होते. प्रत्यक्ष वेळेला नोंदविलेले आणि दिवसभराचे सरासरी तापमान यात ४ ते ५ अंशांचा फरक पडत आहे. जळगावचे गेल्या मार्चमधील कमाल तापमान ३५.६, एप्रिलमध्ये ३९.६, मे मध्ये ४०.४, तर जूनमध्ये ३५.५ इतके नोंदवले होते. राज्यात गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेची लाट भरदुपारी तीव्र होत आहे.

खासकरून दुपारी १ ते ३ या वेळेत अतितीव्र उष्णतेची लाट असते. त्यामुळे या वेळेत बाहेर फिरताना सावधानता बाळगा, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुपारी बाहेर पडताना सनकोट, गॉगल, टोपी, रुमाल, पाण्याची बाटली सोबत ठेवा, उन्हापासून बचावासाठी हेल्मेटचा वापर करा, असा सल्ला हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.

राज्याचे दिवसभराचे सरासरी तापमान (१२ तास)

मालेगाव ४०.६ (सर्वाधिक), पुणे ३७.७, अहमदनगर ३६.८, जळगाव ३९.७, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्वर ३१.४, नाशिक ३७.३, सांगली ३८, सातारा ३७.२, सोलापूर ३९.७, छत्रपती संभाजीनगर ३७.८,

चाळिशी पार केलेली देशातील शहरे

  • पाली (राजस्थान) : ४१,
  • जैसलमेर (राजस्थान) : ४१.८,
  • बारमेर (राजस्थान) ४०.८,
  • बिकानेर (राजस्थान) : ४०.८,
  • बोपानी (हरियाणा) : ४२.१,
  • तिरुपती (आंध्र प्रदेश) : ४१.१,
  • आनंद (गुजरात) : ४०.५,
  • भूज (गुजरात) : ४३,
  • अहमदाबाद (गुजरात) : ४१.

मंगळवारची सर्वात उष्ण शहरे (रेड अलर्ट) (दुपारी ३ वाजता)

जळगाव : ४५.३, तिरोडा (गोंदिया) : ४४.५, अकोला ४४.२, पुणे ४०, धुळे ४१.६, वर्धा ४०.६, मालेगाव ४१.६, नाशिक ४१.६, गोंदिया ४२.४.

परभणी ३९.१, नांदेड ३८.४, बीड ३८.५, अकोला ४०.४, अमरावती ३९, ब्रह्मपुरी ३९.१, चंद्रपूर ३८, वाशिम ३९.६, वर्धा ३९.९, यवतमाळ ४०.५.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news