बाळासाहेबांचा अनादर केलेला नाही : चंद्रकांत पाटील
पुढारी ऑनलाईन डेस्क : मी बाळासाहेबांचा अनादर केलेला नाही, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याबाबत त्यांना मी फोन करणार आहे, असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (दि. ११) माध्यमांशी बोलताना दिले.
बाबरी पाडताना सर्व हिंदुत्ववादी होते. संजय राऊत कुठे होते, हे त्यांनी सांगावे, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. बाळासाहेबांप्रति आमच्या मनात श्रद्धा आहे. अनादर केलेला नाही, हे उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले होते. आपण व्यवस्थापनासंदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये स्वत: उपस्थित होतो, असेही ते म्हणाले होते. पाटील यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून हल्ला केला. चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा स्वत: हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आपल्या विधानाबाबत बोलताना आज चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मी बाळासाहेबांचा अनादर केलेला नाही, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याबाबत त्यांना मी फोन करणार आहे. "
हेही वाचा :
- एकाकी ज्येष्ठ होत आहेत 'टेक्नोसॅव्ही'; एकटे जगताना होतोय ऑनलाइन माध्यमांचा उपयोग
- Data Protection Bill : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डेटा संरक्षण विधेयक सादर केले जाणार : ऍटर्नी जनरल वेंकटरमणी
- मनरेगा योजनेसाठी राज्यांना पुरेसा निधी देण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत, स्वराज अभियानची सर्वोच्च न्यायालयात याचिका

