BSP: लोकसभा निवडणूक: ‘बसपा’कडून १६ उमेदवारांची नावे जाहीर

मायावती ( संग्रहित छायाचित्र )
मायावती ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुजन समाजवादी पक्षाने आज (दि.२४) उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बसपने सात मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. यामध्ये सहारनपूर जागेवर सपा-काँग्रेस आघाडीचे इम्रान मसूद यांच्या विरोधात माजिद अली यांना उभे केले आहे. कैराना लोकसभा मतदारसंघातून श्रीपाल सिंह यांचा सामना इक्रा हसनशी होणार आहे. BSP

मुझफ्फरनगरमधून दारा सिंह प्रजापती, बिजनौरमधून विजेंद्र सिंह रिंगणात आहेत. सुरेंद्र पाल सिंग यांना नगीना (SC) येथून बसपकडून तिकीट मिळाले आहे. मोहम्मद इरफान सैफी यांना मुरादाबादमधून उमेदवारी देण्यात आली आहे. जीशान खान रामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. BSP

शौलत अली यांना संभल लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बसपाने अमरोहा लोकसभा मतदारसंघातून मुजाहिद हुसैन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे कंवर सिंग तवर आणि सपा-काँग्रेस आघाडीचे दानिश अली यांच्याशी होणार आहे.

BSP लोकसभेसाठी उमेदवारांची नावे अशी –

सहारनपूर – माजिद अली
कैराना – श्रीपाल सिंह
मुझफ्फरनगर – दारा सिंह प्रजापती
बिजनौर – विजेंद्र सिंह
नगीना (SC) – सुरेंद्र पाल सिंग
मुरादाबाद – मोहम्मद इरफान सैफी
रामपूर – झीशान खान
संभल – शौलत अली
अमरोहा – मुजाहिद हुसेन
मेरठ – देवव्रत त्यागी
बागपत – प्रवीण बन्सल
गौतम बुद्ध नगर – राजेंद्रसिंग सोळंकी
बुलंदशहर – गिरीशचंद्र जाटव (SC)
आमला – आबिद अली
पीलीभीत – अनीस अहमद खान उर्फ ​​फूलबाबू
शाहजहांपूर (SC) – डॉ.दोद्रम वर्मा

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news