पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) आरकेएस भदौरिया यांनी आज ( दि. २४ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
भाजप प्रवेशानंतर भदौरिया म्हणाले की, मला पुन्हा एकदा राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी भाजप नेतृत्वाचे आभार मानतो. मी भारतीय हवाई दलाची चार दशकांहून अधिक काळ सेवा केली आहे. माझ्या सेवेचा सर्वोत्तम काळ हा भाजप सरकारच्या नेतृत्वाखालील 8 वर्षांचा होता. आमच्या सशस्त्र दलांचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भाजप सरकारने उचललेल्या कठोर पावलांमुळे सैन्यदलांना नवीन क्षमतेसह नवा आत्मविश्वास दिला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार उचलत असलेली पावले खूप महत्वाचे आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.