पुण्यातील मावळमध्ये बाबाराजे देशमुखला खंडणी प्रकरणी अटक, ७० लाखांची मागितली खंडणी

पुण्यातील मावळमध्ये बाबाराजे देशमुखला खंडणी प्रकरणी अटक, ७० लाखांची मागितली खंडणी
Published on
Updated on

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: सोशल मिडीयावर कायम प्रकाशझोतात असलेल्या प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर ७० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय तक्रारदार यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाराजे याची मावळच्या बेबड ओव्हळमध्ये पाच एकर जमीन वनीकरण विभागात समाविष्ट आहे. या जमिनीत प्लॉटिंग होत नाही, याची कल्पना असताना त्याने तक्रारदार यांना २५ गुंठे जागेची विक्री केली. या व्यवहाराचे खरेदीखत न करत आर्थिक फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. खरेदी खत करायचे असेल तर आणखी ७० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून तक्रारदार यांनी बाबाराजेला पाच लाख रुपये दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news