Hyundai Verna : ह्युंदाईच्या 'या' कारची 'जबरदस्त' चर्चा! व्हेरनाचे नवीन मॉडेल लॉन्च

पुढारी ऑनलाईन डेस्क : ह्युंदाई मोटर्स ही भारतातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी आहे. कंपनीच्या व्हेरना या सेडान कारचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कंपनीने (Hyundai Verna) या कारचे अपडेटेड मॉडेल नुकतेच लॉन्च केले आहे. त्यामुळे आता कार चाहत्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. आकर्षक फिचर्स आणि डिझाईन असणारी ही नवी व्हेरना ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर या कारचे फोटो देखील व्हायरल होत आहे. जाणून घेऊया या नव्या व्हेरना कारविषयी अधिक माहिती.
व्हेरनाचे (Hyundai Verna) लॉन्च झालेले नवे मॉडेल सध्या भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. या कारच्या (Ex Showroom) किंमतीविषयी बोलायचे झाले तर, बेसिक मॉडेलची १०.८९ लाख, तर टॉप मॉडेलची १७.३७ लाख रुपये इतकी किंमत आहे.
नव्या व्हेरनामध्ये ६५ हून अधिक सुरक्षाविषयक फिचर, ३० हून अधिक स्टँडर्ड फिचर आणि ६ एअरबॅग सहीत इतर काही आकर्षक फिचर आहेत. त्यामुळे ही सेडान सेगमेंटमधील कार सर्वात वेगळी आणि खास असे आकर्षक मॉडल ठरत आहे.
व्हेरना कारच्या सर्व व्हेरिअंट आणि किंमती
सेडान सेगमेंटमधील व्हेरना लॉन्च झाल्यानंतर या कारच्या नवनवीन फिचर्स आणि इंजिन क्षमतेसह सुसज्ज असणाऱ्या व्हेरिअंटबाबत प्राथमिक माहिती मिळाली. या कारची किंमत, रंग आणि आकर्षक फिचर्स यावर याच्या किंमती अवलंबून आहेत. पुढे दिलेल्या सर्व Ex Showroom किंमती आहेत.
- New Hyundai Verna 1.5L MPi Petrol S 6MT या व्हेरिअंटची किंमत – ११.९५ लाख रुपये
- New Hyundai Verna 1.5L MPi Petrol SX 6MT या व्हेरिअंटची किंमत – १२.९८ लाख रुपये
- New Hyundai Verna 1.5L MPi Petrol SX iVT या व्हेरिअंटची किंमत – १४.२३ लाख रुपये
- New Hyundai Verna 1.5L MPi Petrol SX (O) या व्हेरिअंटची किंमत – १४.६५ लाख रुपये
- New Hyundai Verna 1.5L MPi Petrol SX (O) iVT या व्हेरिअंटची किंमत – १६.१९ लाख रुपये
- New Hyundai Verna 1.5 Turbo Petrol SX 6MT या व्हेरिअंटची किंमत – १४.८३ लाख रुपये
- New Hyundai Verna 1.5 Turbo Petrol SX DCT या व्हेरिअंटची किंमत – १६.०८ लाख रुपये
- New Hyundai Verna 1.5 Turbo Petrol SX (O) MT या व्हेरिअंटची किंमत – १५.९८ लाख रुपये
- New Hyundai Verna 1.5 Turbo Petrol SX (O) DCT या व्हेरिअंटची किंमत – १७.३७ लाख रुपये
हेही वाचा
- WhatsApp new feature: व्हॉट्सॲपचे येणार ‘हे’ भन्नाट फिचर; जाणून घ्या काय असेल खासियत?
- Google ची सेवा डाउन! Gmail, यूट्यूब, ड्राइव्ह ओपन करताना यूजर्संना अडचणी
- Prajaktta Mali : पोस्ट ऑफीस उघडं आहे मालिकेत प्राजक्ताची एन्ट्री!