एलन मस्क यांना मोठा फटका! Tesla ने ३ लाख ६३ वाहने परत मागवली, 'या' दोषामुळे अपघाताचा धोका

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेस्ला (Tesla) कंपनीने सुमारे ३ लाख ६३ हजार इलेक्ट्रिक वाहने परत मागवली आहेत. कारण टेस्लाच्या ड्रायव्हर-सहाय्य तंत्रज्ञानात दोष आढळून आला आहे. या समस्यांमुळे अपघाताचा धोका वाढू शकतो, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनच्या हवाल्याने दिले आहे. टेस्लाची वाहने परत मागवण्याचा निर्णय ‘फूल सेल्फ-ड्रायव्हिंग बीटा’ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या २०१६ ते २०२३ मधील मॉडेल एस, मॉडेल X, मॉडेल ३ आणि मॉडेल Y या टेस्ला ऑटोच्या श्रेणीवर परिणाम करणारा असल्याचे नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनच्या (NHTSA) नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. (Tesla recalling nearly 363,000 electric vehicles)
तांत्रिक समस्येचे निराकरण करण्यासाठी टेस्ला एक सॉफ्टवेअर अपडेट जारी करेल जे दूरस्थपणे लागू केले जाऊ शकते. ”टेस्लाच्या FSD बीटा सिस्टीममधील समस्या म्हणजे कार अशाप्रकारे वळू शकते की ज्यामुळे स्थानिक वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ शकते. तसेच जे ड्रायव्हरने त्याकडे लक्ष न दिल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो,” असे NHTSA नोटीसमध्ये म्हटले आहे.
stop चिन्हावर complete stop येत नसल्याने केवळ वळणाच्या वाहन लेनमध्ये सरळ पुढे जाऊन अथवा नारिंगी लाइट दाखवून ड्रायव्हर-सहाय्यता प्रणाली वाहनाला क्रॉसिंगभोवती असुरक्षित करु शकते, NHTSA ने टेस्लाला पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट केले आहे. ही सिस्टम पोस्ट केलेल्या वेग मर्यादेतील बदलांना अपुरा प्रतिसाद देऊ शकते, असेही त्यात पुढे म्हटले आहे.
या निर्णयामुळे टेस्लाचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरले
दरम्यान, तांत्रिक कारणामुळे वाहने परत मागविण्याच्या निर्णयामुळे टेस्लाचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांनी घसरले. टेस्लाचे मुख्य कार्यकारी एलन मस्क यांच्यासाठी हा निर्णय धक्का देणारा आहे. त्यांनी ट्विट करत एका यूजरशी सहमती दर्शवत म्हटले आहे की “रिकॉल” (परत मागवणे) हा शब्द महत्त्वाच्या दुरुस्तीशिवाय सोडवल्या जाऊ शकणार्या समस्यांसाठी वापरला जाऊ नये. ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपडेटसाठी ‘रिकॉल’ हा शब्द कालबाह्य आहे आणि अगदी चुकीचा आहे!, असा दावा मस्क यांनी केला आहे.
तपासणी करताना आढळला दोष
अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन टेस्लाच्या ड्रायव्हर सहाय्य प्रणालीची तपासणी करत असताना हा तांत्रिक दोष आढळून आला आहे. गेल्या महिन्यात, Tesla ने खुलासा केला होता की न्याय विभागाने त्याच्या ड्रायव्हर-सहाय्य प्रणालीची तपासणी सुरू केली आहे. २०१९ मध्ये मस्क यांनी सांगितले होते की कंपनी एका वर्षाच्या आत पूर्णपणे स्वतः वाहन तयार करण्यास सक्षम असेल. पण अद्याप हे शक्य झालेले नाही.
Tesla is recalling nearly 363,000 electric vehicles because of problems with their driver-assistance technology that heighten crash risk, the National Highway Traffic Safety Administration announceshttps://t.co/xMhyHcOPNL
— AFP News Agency (@AFP) February 17, 2023
हे ही वाचा :
- Tesla Layoffs – एलन मस्क यांना मंदीची झळ; टेस्लातून होणार नोकरकपात
- Tesla in India : इलेक्ट्रिक कार टेस्लाची भारतात विक्री केव्हा होणार? एलन मस्क यांनी दिले उत्तर…