

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताकडून पदकांची कमाई सुरूच आहे. नेमबाजीतील 'ट्रॅप-50' प्रकारात पुरूष संघाने सुवर्ण तर महिला संघाने रौप्य पदक पटकावले आहे. (Asian Games 2023 )
भारताच्या पृथ्वीराज तोंडाईमन, किनान चेनई आणि झोरावर सिंग संधू या पुरुष संघाने 'ट्रॅप-50' सांघिक क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तर मनीषा कीर, प्रीती रजक आणि राजेश्वरी कुमारी यांनी नेमबाजीतील 'ट्रॅप' सांघिक क्रिडा प्रकारात स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. (Asian Games 2023 )
भारत 41 पदके जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ आणि सातव्या दिवशी पाच पदके मिळाली. आठव्या दिवशी आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन पदके जमा झाली आहेत. आतापर्यंत भारताच्या खात्यात 11 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कांस्य पदके आहेत.
आशियाई स्पर्धेतील आज (दि.30) सातव्या दिवशी भारताने विविध क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळांडूनी आतापर्यंत एकूण ४१ पदकांची कमाई करत पदकतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जाणून घेवूया आजवरच्या भारताच्या नेमबाजी पदक विजेत्या खेळाडूंची कामगिरी…