

पुढारी ऑनलाईन डेस्क : अशोक चव्हाण भाजपसोबत गेल्याचं समजलं. चव्हाणांचं आम्हाला आश्चर्य वाटतं. आदर्श घोटाळा लपवण्यासाठी ते गेले असतील किंवा त्यांना कदाचित राज्यसभेची आस लागली असेल. भाडोत्री लोक घेण्याची वेळ भाजपवर आली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांना मोदींची गॅरंटी नाही मात्र भ्रष्टाचाऱ्यांना गॅरंटी आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होणार नाही याची मोदी गॅरंटी आहे. भाजपची अवस्था काँग्रेसव्याप्त झाली आहे. आता काँग्रेसही अशोक चव्हाणांच्या हाती देणार का? असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. जनतेत येवून मिंधेंनी शिवसेना कुणाची ते सांगावे? असे आवाहनही ठाकरे यांनी शिंदे गटाला केले आहे.
हेही वाचा :