

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपमध्ये जाण्याचा अजून निर्णय नाही. काँग्रेसमध्ये होतो तो पर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल तक्रार करायची नाही. मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. यापुढे राजकीय भूमिका २ दिवसात ठरवणार, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
संबंधित बातम्या –
पक्षाच्या अंतर्गत बाबींवर मला भाष्य करायचे नाही. कालपर्यंत मी काँग्रेसच्या बैठकीत होतो, नाराजी नाही. कोणत्याही आमदाराविषयी भाष्य करायचे नाही. मी कोणताही अद्याप घेतलेला नाही. माझा राजीनाम्याचा वैयक्तिक निर्णय आहे, कोणाचाही दबाव नाही. मी कोणत्याही नेत्यांसोबत चर्चा केलेली नाही. अशोक चव्हाणांनीही पक्षासाठी खूप केलं, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.