

आर्यन खानच्या अटकेनंतर खान परिवाराची मोठी चर्चा सुरू आहे. शाहरुख-गौरी खान यांच्यानंतर आता सुहाना खानचीही ( Suhana Khan) चर्चा होत आहे. २ ऑक्टोबरपासून आर्यन ड्रग्स केस प्रकरणात अडकलाय. आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आर्यनची बहिण सुहाना खानची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येतीय.
सुहाना खान ( Suhana Khan) सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. आर्यनला अटक झाल्यानंतर ती तात्काळ भारतात येणार होती; पण शाहरुख खान आणि गौरीने तिला भारतात येण्यास नकार दिल्याचं समजतंय.
मीडिया रिपोर्टनुसार, तिची प्रकृती बिघडल्याचं समजतेय. दरम्यान, ती आर्यन बद्दल अपडेट घेत आहेत. दुसरीकडे, शाहरुख-गौरी आर्यनला जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. कोर्टाने त्याचा एक जामीन अर्ज फेटाळलाय. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
आर्यन खान सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. २ ऑक्टोबरला मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवरच्या ड्रग पार्टीमध्ये त्याला पकडण्यात आलं होतं. आर्यन खानच्या जामिन याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली होती. मात्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारला. प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे हे आर्यनची केस लढत होते. पण, नव्या वकिलांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आर्यनची बाजू आता वकील अमित देसाई लढवणार आहेत. अमित देसाई हे स हिट ॲड रन प्रकरणातील सलमान खानचे वकील होते. हिट अँड रन प्रकरणी सलमानला ५ वर्षांची शिक्षा झाली होती. पण, याला आव्हान देत त्यांनी सलमानची बाजू मांडली. त्यांनी सलमानला केवळ ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळवून दिला होता.