

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने 3 प्रमुख रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानक, अहमदाबाद रेल्वे स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे रेल्वेचे महत्त्वाचे आणि केंद्रीय स्थान आहेत. रेल्वेच्या कायापालटामध्ये रेल्वे स्थानकांच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिले आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे रेल्वे स्थानकांच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे.
199 रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सध्या सुरू आहे. यापैकी 47 रेल्वे स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. उर्वरित स्थानकांचे नियोजन आणि रचनेचे काम सुरू आहे. 32 स्थानकांचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) आणि अहमदाबाद रेल्वे स्थानक या तीन मोठ्या स्थानकांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
हेही वाचा