Neeraj Chopra : नीरज चोप्राने रचला आणखी एक इतिहास; डायमंड लीग जिंकली

Neeraj Chopra : नीरज चोप्राने रचला आणखी एक इतिहास; डायमंड लीग जिंकली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑलिम्पिकपासून ते वर्ल्ड चॅम्पियनशिपपर्यंत नीरज चोप्राने डायमंड लीगमध्येही भारताला अभिमान वाटवा अशी कामगिरी केली आहे. त्याने डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले आहे, असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. झुरिच येथे झालेल्या स्पर्धेत नीरजने 88.44 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह त्याने विजेतेपद पटकावले. (Neeraj Chopra)

ऑलिम्पिकनंतरचा आणखी एक विक्रम

गेल्या महिन्याच्या अखेरीस नीरजने डायमंड लीगमध्ये पहिले स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली होती. स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे गुरुवारी 8 सप्टेंबरच्या रात्री उशिरा अंतिम सामना झाला. या सामन्यात नीरज जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्सच्या अनुपस्थितीमुळे नीरजचा विजय आणखीनच निश्चित दिसत होता. आणि अंतिम सामन्यात झाले तसेच नीरज चोप्राने विजेतेपद पटकावत चाहत्यांना निराश केले नाही. (Neeraj Chopra)

खराब सुरुवात, शेवट गोड

डायमंड लीगच्या अंतिम सामन्यात नीरजची सुरुवात खराब झाली. त्याचा पहिलाच प्रयत्न फाऊल ठरला. नीरजसोबत असे घडणे आश्चर्यकारक होते. अनेकदा नीरज पहिल्याच थ्रोमध्ये त्याचा भाला खूप अंतर मिळवत असतो. यानंतर कमबॅक करत नीरजने आपली चमक दाखवत दुसऱ्या थ्रोमध्ये ८८.४४ मीटर अंतरावर भाला फेकून अंतिम सामन्यातील जेतेपद पटकावले. नीरजनंतर चेक प्रजासत्ताकचा याकुब वडलिच याने चौथ्या प्रयत्नात ८६.९४ मीटर लांब भाला फेकला.

या स्पर्धेत फायनलमध्ये प्रत्येकाला 6-6 भाला फेकण्याच्या संधी देण्यात आल्या होत्या. परंतु, कोणत्याही खेळाडूला नीरजला मागे टाकू शकले नाहीत. नीरजने फायनलमध्ये मोठे तीन फेकले. 88.44 व्यतिरिक्त, त्याने 88 आणि 87 मीटर लांब भाले फेकले.

नीरजचा शानदार हंगाम

विजयासह नीरजने शानदार हंगामाचा शेवट केला. नीरजने यंदाच्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्यानंतर त्याने सलग दोनदा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. नीरजने प्रथम पावो नूरमी गेम्समध्ये 89.30 मी आणि नंतर स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटरसह विक्रम केला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news