Ankush Movie : ‘अंकुश’ चित्रपट या दिवशी होणार रिलीज

ankush movie
ankush movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेल्या "अंकुश" चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. (Ankush Movie) दमदार स्टारकास्ट, अॅक्शन, रोमान्स आणि मनोरंजनाचा पुरेपूर मसाला या चित्रपटात आहे. ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. (Ankush Movie)

दरम्यान, या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच झाला. अभिनेते जॉनी लिव्हर, अभिनेते अली असगर आणि अभिनेते कृष्णा अभिषेक यांच्या हस्ते चित्रपटाच म्युझिक आणि टीझर लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टीत प्रचंड उत्सुकता असून येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे . दीपराज हा नव्या दमाचा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे. चित्रपटात अभिनेत्री केतकी माटेगांवकर, अभिनेते सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी तगडी स्टारकास्ट आहे.

मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार- महेश यांनी या सिनेमाचे संगीत केले आहे. हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे. मंगेश कांगणे, क्षितिज पटवर्धन, समृद्धी पांडे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज , हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि केजीएफसारख्या चित्रपटांचे अॅक्शन दिग्दर्शक विक्रम मोर, विख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी नृत्य दिग्दर्शन, कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर यांनी केलं असून विशाल चव्हाण कार्यकारी निर्माता आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news