anil kapoor
anil kapoor

Fighter Movie : अनिल कपूरचा ‘फायटर’ लूक, कॅप्टन राकेश जयसिंगच्या भूमिकेत दिसणार

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अ‍ॅनिमलने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडला आणि चित्रपट ५०० कोटी च्या क्लबच्यामध्ये सामील झाला आहे. मेगास्टार आणि 'बॉलिवुडचा बाप' अनिल कपूर सिद्धार्थ आनंदच्या फायटरमध्ये आणखी एका वेगळ्या भूमिकेसह प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी सज्ज झाला आहे.

संबंधित बातम्या –

'नाईट मॅनेजर' अभिनेत्याने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर रॉकी उर्फ ​​ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंग या व्यक्तिरेखेची ओळख करून देणारे दमदार पोस्टर पोस्ट केले आहे.  पोस्टमध्ये म्हटलं आहे-

"ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग

कॉल साइन: रॉकी

पदवी : कमांडिंग ऑफिसर

युनिट: एअर ड्रॅगन

फायटर सदैव ??

#FighterOn25thJan #Fighter"

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अनिल कपूर सध्या जोरदार चर्चेत असून जुग जुग जीयो, द नाईट मॅनेजर आणि आता अ‍ॅनिमलच्या सध्याच्या मोठ्या यशासह हा 'अनिमल का बाप' त्याच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. फायटरमधील रॉकीच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी तो तयार होत आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून आणि त्याचे प्रोडक्शन हाऊस, मार्फ्लिक्स पिक्चर्स निर्मित आहे. अनिल कपूर व्यतिरिक्त यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत हा चित्रपट २०२४ च्या प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news