Anil Bonde: नाक खूपसू नका अन्यथा गुदमरून मराल! खासदार अनिल बोंडेंचा राऊतांना टोला

Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: 'सामना'वाल्यांनी म्हणजेच खासदार संजय राऊत यांनी 'फेव्हिकॉलच्या जोडीत' नाक खुपसू नये. अन्यथा नाकपुड्या बंद होवून गुरूमरून मराल, असा खोचक टोला भाजपचे राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी शुक्रवारी लगावला. युतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पालघरच्या सभेत जाहीर केले. पंरतु, त्यांनी ही सभा व्यवस्थित ऐकली नसावी, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.

थेट दारापर्यंत पोहोचवणाऱ्या राज्य सरकारमुळे खऱ्या अर्थाने विकास लोकांपर्यंत पोहचला. वर्षभरापासून सर्व ताकदीनिशी सरकार कार्यरत आहे, हे जनतेला माहिती आहे. शेतकऱ्यांच्या अडी-अडचणीत सरकार धावून येते. बळीराजासाठी १५०० कोटी जाहीर केले, मच्छिमारांसाठी योजना आणल्या आहेत, असा दावा देखील बोंडे यांनी केला.

२०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला लोकांनी स्वीकारले. पंरतु, निकालानंतर घडलेल्या घडामोडी लोकांना पटलेल्या नाहीत. भाजप-शिवसेनेचे आताचे समीकरण लोकांना आवडले आहे. येत्या निवडणुकीत देखील मतदार युतीला पसंती देतील असा दावा बोंडे यांनी केला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news