Amruta Photo: केसांत गजरा चंद्राचा नखरा; चंद्रावाणी फुलला मुखडा गं…

Amruta Photo: केसांत गजरा चंद्राचा नखरा; चंद्रावाणी फुलला मुखडा गं…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसाद ओक दिग्दर्शिक आणि विश्वास पाटील यांच्या कांदबरीवर आधारीत चंद्रमुखी (Chandramukhi) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील चंद्रमुखी गाणे आणि चंद्राची भूमिकेने आजही चाहत्याच्या मनावर राज्य केले आहे. चित्रपट येवून जवळपास दिड महिने उलटले असले तरी आजही अगदी लहानपासून ते मोठ्यापर्यत्न चंद्रा गाण्यावर ताल घरताना पाहिले जात आहे. आता मराठी भाषेतील हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरने चंद्राची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या प्रमोशननंतर अमृताचे ( Amruta Photo ) नवनविन हटके लूक समोर येत आहेत.

अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)ने नुकतेच पुन्हा एकदा पांढऱ्या रंगाच्या साडीतील हटके फोटो ( Amruta Photo ) सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या नखऱ्याने चाहत्यांना भरळ घातली आहे. यावेळी तिने कानात झुमके, केसांचा अंबाडा आणि त्यावर सुंदर असा गजरा घातल्याचे दिसतेय. याशिवाय तिच्या न्यूज मेकअपने तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसतेय. या फोटोतील खास म्हणजे, अमृताने आपल्या निखळ हास्याची जादू दाखविली आहे. तिच्या लाजणाऱ्या आणि हासणाऱ्या अदांनी चाहत्यांना भूरळ पडली आहे.

अमृताने या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रवानी फुलला गं' आणि'? wala safed' असे लिहिले आहे. यावरून अमृता अजूनही चंद्राच्या आठवणीत रममान असल्याचे दिसून येत आहे. याआधीही अमृताने पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले होते.

मध्यंतरी अमृताच्या आयफा पुरस्कार सोहळ्यातील लुकची जोरदार चर्चा झाली. यावेळी तिने ब्लॅक आणि ब्लू रंगाच्या आऊटफिटने सोशळ मीडियात धुमाकूळ घातला होता. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे. यात मंजिरी ओक यांनी 'गुड' म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

तर काही नेटकऱ्यांनी 'नजर लागू नये', 'कडक', 'सुंदर चंद्राचा मुखडा', 'आह्ह्ह ….. चांद्रावानी फुलला नाही. चंद्र च आहे तो', 'या हास्यावर जग फिदा', 'लाजरा नं साजरा मुखडा… ', 'फक्त आमच्या गोड आमुचा…आणि फुलून त्या मुखड्यानं अख्खं रान बहरून टाकलं….प्रेम ❤', 'चंद्राचा साज', 'सुंदरा❤️❤️', 'कातिल अदायें…, नुसतं प्रेम', 'सुंदरतेचा खजिना', 'क्युटनेसचा ओव्हरलोड', 'सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली', 'हवेलीत शिरली मोत्याचा भांग…', 'लाजवाब' 'सुंदर दिसत आहेस तू', 'Omg wow', 'Beautiful', 'Gorgeous', 'Uffffff'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी फायर आणि हार्टचे ईमोजी शेअर केले आहेत.

चंद्रमुखी चित्रपटात अभिनेत्री अमृतासोबत अभिनेता अदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, प्राजक्ता माळी, समीर चौघुले हे कलाकारदेखील आहेत. चंद्रा हे गाणे गायिका श्रेया घोषालने गायिले आहे. या गाण्याचे शब्द लेखक कवी गुरू ठाकूर यांनी लिहिले आहेत. तर अजय-अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news