Latest

विठ्ठल रूक्मिणी मंदिर पुत्रदा एकादशीनिमित्त मनमोहक फुलांनी सजले (फोटो)

backup backup

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बुधवारी पुत्रदा एकादशीनिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली. यामुळे मंदिरात फुलांचा सुगंध दरवळला असून मंदिर मनमोहक दिसत आहे.

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आज पुत्रदा एकादशीनिमित्त श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्रींच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

श्रींचा गाभारा व मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजवून मनमोहक स्वरूप देण्यात आले आहे.

याकरिता रांजणगाव, पुणे येथील विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचूदकर पाटील यांनी सजवाट केली आहे.

यासाठी झेंडू, अष्टर, आरकेड, कार्नेशन, शेवंती, कामिनी, गुलाब, मोगरा, तुळस आदी प्रकारच्या ७०० किलो पानाफुलांचा
१०० गड्डी फुलांचा वापर करण्यात आला आहे.

ही सजावट साकारून विठ्ठल रूक्मिणी मंदिर मनमोहक दिसत आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. तरीही पुत्रदा एकादशी निमित्ताने  ही सजावट केली आहे.

आलेली आकर्षक फुलांची आरास, सजावटीचे दर्शन भाविकांना घर बसल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर हाोते.

तसेच विविध सोशल माध्यमातून घेता येत आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

मंदिर बंदच

दरवर्षी विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट केली जाते. यावर्षी भाविकांना मंदिर खुले केले नसले तरी पूजेचे नित्यविधी होत आहेत. यंदाच्या आषाढी वारीला परवानगी द्यावी या मागणीसाठी वारकारी आक्रमक होते. मात्र, राज्य सरकारने ठराविक मर्यादा घालून देत आषाढी वारी पार पाडली. गेल्या दोन वर्षांपासून मंदिर बंद आहे. त्यामुळे वारकरी सध्या फोटोंच्या माध्यमातूनच विठ्ठल दर्शन घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT