लातूर; पुढारी वृतसेवा शहरातील पूर्व भागात आज (बुधवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूर्गभातून आवाज आल्याने लोक भयभीत झाले. तथापी हा भूकंपाचा धक्का नसल्याने घाबरुन जावू नये असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी या प्रकारचा आवाज लातूर मधील पूर्व भागातील रिंग रोड, गंगाधाम, साठ फुटी रस्ता, सिध्देश्वर मंदीर परिसर, डी मार्ट या परिसरात जानवल्याचे सागितले.
दरम्यान कोळपा येथील एमडीए रॉयल इंटरनॅशनल स्कुल शाळेतील विद्यार्थ्याना सुरक्षेच्या कारणावरुन त्यांच्या घरी सुरक्षीतपणे पाठवण्यात आल्याची माहिती शाळेचे सतीश अंबेकर यांनी दिली.
हेही वाचा :