Maharashtra Political Crisis : पक्षांतर बंदी नव्हे तर पक्षांतर्गत नाराजीचा हा मुद्दा; उद्धव ठाकरेंवर पक्षातील अनेक नेते नाराज – कौल

Maharashtra Political Crisis : पक्षांतर बंदी नव्हे तर पक्षांतर्गत नाराजीचा हा मुद्दा; उद्धव ठाकरेंवर पक्षातील अनेक नेते नाराज – कौल

Published on

पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी सुरू आहे. हरिश साळवे यांच्यानंतर आता नीरज किशन कौल हे शिंदे गटाकडून युक्तीवाद करत आहे. त्यांनी हा मुद्दा पक्षांतर्गत बंदीचा नव्हे तर पक्षांतर्गत नाराजीचा हा मुद्दा आहे. तसेच एखाद्या नेत्याला तुम्ही त्याच्या पदावरून हटवू शकत नसाल तर त्यावर पक्षांतर्गत बंदीनुसार कारवाई करणे अयोग्य आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षातील अनेक नेते नाराज होते, असे कौल यांनी म्हटले आहे.

हा घटनाक्रम म्हणजे लोकशाहीची हत्या असे केवळ चित्र रंगवण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न

पक्षांतर्गत नाराजीचा मुद्द्यावर विचार करावा

बहुमत नसलेल्या ठाकरे गटाने व्हीप जारी केला

ज्यांच्याकडे विश्वास नव्हता त्यांनी व्हीप जारी केला

आम्हीच खरी शिवसेना, आम्ही शिवसेनेतच आहोत मात्र आम्ही नेत्यावर नाराज आहे, मग ते आमचे नेते कसे?

ज्या नेत्यावर आमदारांची नाराजी तो नेता मुख्यमंत्री कसा? – कौल

नबाम रेबिया प्रकरणावर युक्तीवाद करा – सर्वोच्च न्यायालय सर न्यायाधीश

नबाम रेबिया प्रकरण बाजूला ठेवून या प्रकरणाकडे पाहूया आणि या प्रकरणावर भाष्य करू या

सरन्यायाधीशांची महत्वपूर्ण टिप्पणी

बहुमत चाचणीला स्थगिती दिल्यानंतर ठाकरेंकडे दोन मार्ग

मात्र बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news