भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने इन्स्टाग्रामवरील पोस्टवर 'भूतलावरील सर्वात हॉटेस्ट मुलगा' अशी प्रतिक्रिया दिली. ही इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे टीम इंडियाचा लेग स्पिनर यझुवेंद्र चहलची. यझुवेंद्र चहलच्या या फोटोला रविंद्र जडेजाने भूतलावरील सर्वात हॉटेस्ट मुलगा अशी प्रतिक्रिया दिली.
यझुवेंद्र चहलने आपली पत्नी धनश्री वर्माने काढलेला फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. त्याला त्याने जे काही चांगले वाटते ते करा असे कॅप्शन दिले. या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. या पोस्टला ४ लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. यझुवेंद्र चहल सध्या आरसीबीकडून आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.
यझुवेंद्र चहल हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. तो आपल्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या पत्नीसोबतचे आपल्या संघ सहकाऱ्यांसोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. चहल नुकताच श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी २० मालिकेत दिसला होता. भारताने एकदिवसीय मालिका २ – १ अशी जिंकली तर टी २० मालिका १ – २ अशी गमावली होती.
यानंतर आता यझुवेंद्र आरसीबीकडून युएईमध्ये होमाऱ्या आयपीएलच्या उर्वरित १४ व्या हंगामात खेळणार आहे. त्याने आयपीएल हंगाम स्थगित होण्यापूर्वी झालेल्या सात सामन्यात ४ विकेट घेतल्या होत्या. आता तो उर्वरित हंगामात जास्तीजास्त विकेट घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
आयपीएलचा १४ वा हंगाम गेल्या मे महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित हंगाम हा युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा हंगाम १५ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यानंतर लगेचच १७ ऑक्टोबरला टी २० वर्ल्डकप युएईमध्ये सुरु होणार आहे. टी २० वर्ल्डकप हा युएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
यझुवेंद्र चहल आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो त्यावर त्याचे टी २० वर्ल्डकप संघात स्थान अवलंबून आहे. त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी कुलदीप यादव, राहुल चाहर या फिरकीपटूंशी स्पर्धा करावी लागणार आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : कोकणी खेकडा फ्राय रेसिपी माहीत आहे का?