आशिष शेलार  
Latest

महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे : आशिष शेलार

स्वालिया न. शिकलगार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे आहेत. अशा शब्दांत भाजप नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ॲड. आशिष शेलार रत्नागिरी येथे बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. रत्नागिरीतून येथून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. शेलार यांनी रत्नागिरी जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आमदार शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं, कुटुंब माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे. या धोरणाने काम करीत आहेत.

उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. त्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षड्यंत्र केले. तर सुरेश प्रभू यांनासुध्दा अपमानास्पद वागणूक ठाकरेंनी दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झालं. अन्य नावे मी घेत नाही.

आता नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोकणाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखतं ? असा सवाल त्यांनी केला. याचा संताप कोकणवासीयांनामध्ये आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल. असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्रात असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हेच आहेत. वडाळ्यातील एका व्यक्तीने सरकार विरोधी लिहिले. म्हणून त्याचे सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आले. एका निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एक व्यंगचित्र फॉरवर्ड केले. म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला तर अभिनेत्री कंगना यांचे घर तोडण्यात आले.

महाराष्ट्रात असहिष्णुतेचे वातावरण

सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक केलं गेलं. महाराष्ट्रात आज जे असहिष्णुतेचे हे वातावरण तयार झालेय. त्याचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत. अशा शब्दांत शेलार यांनी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळात कोकणाला मोठे स्थान दिले. म्हणून जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी ही यात्रा निघाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरिबांसाठी ज्या अनेक योजना आहेत. त्या आता घराघरात, गावागावात आपण घेऊन जाऊ या. असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

हेदेखील वाचा- 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT