नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचे प्रतिभावंत चार बालकांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२' जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले तसेच प्रातिनिधिक बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सहा श्रेणींमध्ये देशातील २९ बालकांची 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२' साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील शिवांगी काळे (६,जळगाव), जुई केसकर (१५,पुणे), जिया राय (१३,मुंबई) आणि स्वयंम पाटील (१४,नाशिक) या बालकांचा समावेश आहे. पदक, १ लाख रूपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
IAS केडर सुधारणेवरून मोदी सरकार आणि राज्य सरकारांमधील वाद शिगेला ; काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्रातील बालकांच्या प्रतिभेचा सन्मान
Bank Holiday Alert : फेब्रुवारी महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी कला व संस्कृती, शौर्य, नवसंशोधन,सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा या सहा श्रेणींमध्ये 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार'-२०२२ पटकाविणाऱ्या २९ बालकांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले. पुरस्कार विजेत्यांमध्ये २१ राज्य व केंद्र प्रदेशातील १५ मुल आणि १४ मुलींचा समावेश होता. या कार्यक्रमातच पंतप्रधानांनी वर्ष २०२१ च्या 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार' विजेत्या ३२ बालकांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे वर्ष २०२२ चे पंतप्रधान 'राष्ट्रीय बाल पुरस्कार' (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई देखील यावेळी उपस्थित होत्या.