प्रभास  
Latest

प्रभास याच्या राधेश्याम चित्रपटाची प्रतीक्षा संपली, या दिवशी होणार रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : प्रभास याच्या राधेश्याम चित्रपटाची प्रतीक्षा संपली. प्रभास याचा हा चित्रपट कुठल्या दिवशी रिलीज होणार. याविषयी सर्वांनाचं उत्सुकता लागून राहिली होती. आता या चित्रपटाची तारीख रिलीज झाली आहे.

अधिक वाचा –

त्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. त्यात तो एक डेपर लुकमध्ये युरोपातील रस्त्यांवर भटकताना दिसत आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे की, चित्रपट येत्या मकर संक्रांती/पोंगलला म्हणजेच १४ जानेवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होईल.

अधिक वाचा – 

कॅप्शनमध्ये लिहिले आहे. "Can't wait for you all to watch my romantic saga, #RadheShyam, which has a brand new release date – 14th January, 2022 worldwide!"

अधिक वाचा – 

प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या चित्रपटाची वाट पहात आहेत. या बातमीने प्रेक्षकांना अतिशय उत्साहित केले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे.- हा चित्रपट या वर्षीच्या सर्वात मोठया चित्रपटांपैकी एक असेल. प्रभासचे चाहते निश्चितच या घोषणेने आनंदित झाले आहेत.

या चित्रपटासोबत प्रभास रोमांटिक शैलीत परतत आहे. यामध्ये प्रभास आणि पूजा हेगडे यांची नवी जोड़ी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. त्यामधून प्रभास लव्हरबॉय इमेजमध्ये दिसत आहे.

हा चित्रपट १४ जानेवारी, २०२२ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. राधेश्याम एक बहुभाषी चित्रपट आहे. गुलशन कुमार व टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही यूवी क्रिएशन्सची निर्मिती आहे. निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे.

पाहा व्हिडिओ – डिंपल को सिम्पल नहीं समझनेका ! देवमाणूस फेम अस्मिता देशमुख बरोबर खास गप्पा !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT