भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा तब्यात अचानक बिघडल्याने पानीपतमधील स्वागत समारंभ अर्ध्यावर सोडून गेला. भालाफेकपटू नीराज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सवर्ण पदक जिंकले. त्यानंतर तो भारतात परतला, त्याच्या स्वागतासाठी आज ( दि. १७ ) पानीपत येथे एक रोड शो आयोजित केला होता. पण, त्याला हा रोड शो अर्ध्यावरच गुंडळावा लागला. त्याला चांगलाच ताप भरल्याने कार्यक्रमही आवरता घ्यावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नीरज चोप्रा देखील हजर होता. मात्र त्याची प्रकृती ठिक नव्हती. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
त्यांनंतर नीरज पानीपत येथे पोहोचला. त्याच्या स्वागतासाठी दिल्ली ते पानीपत अशी कार रॅलीही आयोजित करण्यात आली होती. मात्र रॅली सुरु असतानाच नीरज ती अर्धवट सोडून गेला. याबाबत नीरजचे मित्र आणि कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला कार्यक्रमादरम्यान अस्वस्थ वाटत होते. रॅली सुरु असतानाच नीरज चोप्रा औषधे घेत असल्याचे दिसत होते. नीरजला उष्णतेचा त्रास झाला. सध्या त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे.
नीरज चोप्रा जेव्हापासून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून परतला आहे तेव्हापासून तो आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचे देशातील अनेक भागात सत्कार आणि गौरव समारंभ होत आहेत. त्याचे मूळ शहर पानीपत येथेही त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, नीरज चोप्राची आई सरोज देवी यांनी सांगितले की, 'त्याचे मोठे स्वागत होणार आहे. मी त्याच्यासाठी चुर्मा तयार केला आहे. आम्ही त्याचे सुवर्ण पदक देवळात ठेवणार, देवाच्या आशीर्वादामुळेच तो इथंपर्यंत पोहचला आहे. मी तो येण्याची वाट पाहत आहे.'
नीराज चोप्राने स्वतंत्रतादिवस समारंभानंतर 'आज ऐतिहासिक लाल किल्ल्यावरील स्वतंत्रता दिवस समारंभ पहायला मिळणे हा एक सन्मानच आहे. एक खेळाडू आणि सैनिक म्हणून आपला तिरंगा उंच फडकताना पाहून ऊर भरुन आले.' असे ट्विट केले होते.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : नीरज चोप्राच्या सुवर्णमय कामगिरीनंतर पीएम मोदींची फोनाफोनी!
https://youtu.be/r-lG9gBXOsA