नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी १३० कोटी भारतीय कठोर मेहनत करतील याविषयी मी आशावादी आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ट्विटरवरून व्यक्त केली.
आपल्या देशाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला ऑगस्ट महिन्याला सुरुवात झालेली असताना, प्रत्येक
भारतीयाच्या हृदयाला स्पर्श करतील अशा अनेकानेक घटना घडताना दिसत आहेत.
आपल्या देशात विक्रमी संख्येने कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. वस्तू आणि सेवा कर संकलनाची आकडेवारी देशाच्या मजबूत आर्थिक स्थितीची निदर्शक आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळविलेल्या पदकासाठी ती पात्र होतीच. पंरतु, पुरुष आणि महिला हॉकी
संघांनी देखील या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याचे आपण बघितले.
आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील अशी आशा आहे, असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
हेही वाचलं का?