देवमाणूस  
Latest

देवमाणूस : डॉक्टरला शिव्याशाप देणाऱ्या सरु आजीची ‘पडद्यामागील कहाणी’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : तुमची झाली तरकट…तुमच्या पालखीचा निघाला धूर… तुझी तिरडी ढासाळली तुझी, तुझा मुडदा बसवला तुझा अशा शिव्याशाप देणारी सरु आजी हिची सर्वांच्याच परिचयाची होती. देवमाणूस ही मालिक संपली असली तरी यातील पात्र सर्वांच्या लक्षात आहे. तुम्हाला माहिती आहे का? डॉक्टर अजित कुमार देव आणि सरु आजी यांचं पडद्यामागे बॉन्डिंग कसं आहे?

अधिक वाचा- 

डॉक्टर अजित कुमारचं नाव जरी घेतलं तरी आजीच्या तळपायाची आग मस्तकाला जायची. ती डॉक्टरला शिव्या द्यायची. त्याला वेळोवेळी शिव्याशाप द्यायची. डॉक्टर तिच्या वाड्यात राहायला होता म्हणून ती चिडायची.

अधिक वाचा-

पण, तुम्हाला माहिती आहे का? देवमाणूस मालिकेत दोघे एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या कलाकारांचा मात्र बॅकस्टेजला खूप जिव्हाळा होता.

देवमाणूस मालिका सुरु झाली. पण, पुढे या मालिकेत काय असणार आहे, हे फारसं समजत नव्हतं. पुढे आजीची एन्ट्री झाली. आणि एकच धूर निघाला, तो म्हणजे शिव्यांचा. आजीचा संवाद कमी. पण, शिव्या मात्र भरपूर ऐकायला मिळाल्या.

अधिक वाचा-

ग्रामीण बोली भाषेतील म्हणी आणि शिव्यांनी सरु आजीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्या म्हणीही ऐकायला प्रेक्षकांना आवडल्या होत्या.

डॉक्टरचा द्वेष मात्र…

पण, तुम्हाला माहितीये का? पडद्यावर डॉक्टरचा द्वेष करणारी आजी पडद्यामागे मात्र कौतुक करताना दिसतेय. डॉक्टर आणि आजी यांची 'परदे के पीछे की कहानी' वेगळीच आहे. किरण गायकवाडने त्याचे स्वत:चे आजीसोबतचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये पडद्यामागे त्यांच्यात किती जिव्हाळा आहे. हे दिसून येतं. एका फोटोला किरणनं लिहिलंय…Offscreen chemistry.

आणखी एका फोटोला त्याने कॅप्शन दिलीय की-'आपला पॅटर्नच वेगळा ये' तर आणखी एका फोटोला म्हटलंय…अँखियो से गोली मारे
दोघांचा swaaaag च वेगळा आहे.

किरणने आजीसोबतचे तीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तर हे फोटो पाहून चाहते त्याच्यकडे मागणी करु लागलेत. चाहते कमेंट करून म्हणताहेत की-आजीच्या शिव्यांचा व्हिडिओ शेअर कर भाऊ. तर आजीला कमेंट करत 'धूर वाली आजी' अशी थेट उपमा देण्यात आली आहे.

एकाने कमेंट्मसध्ये म्हटलंय की-छान अभिनय. Lot of potential. तो मी नव्हेच. तर काही चाहत्यांनी मागणी केली आहे की- देवमाणूस ही सीरीयल संपवू नका.

एकूणचं छोट्या पडद्यामागं आजी आणि डॉक्टर यांचा स्वॅग वेगळा असलेला दिसून येतो.

हेदेकील वाचलंत –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT