देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा धुळयाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उपचारासाठी वायुसेनेच्या विमानाने मुंबई येथे हलवण्यात आले आहे. त्यांना चिकुन गुनियाचा त्रास होत असल्याचे सांगीतले जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रमणध्वनीवरुन खा डॉ भामरे यांची प्रकृतीची विचारणा केली असुन त्यानंतर तातडीने वायुसेनेचे विमान उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना गेल्या काही दिवसापासुन प्रकृती अस्वास्थ असल्याने त्यांच्यावर धुळ्यात उपचार करण्यात येत होते. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळाल्याने त्यांनी तातडीने भ्रमणध्वनीवरुन खा भामरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर तातडीने बंगळुरु येथून वायुसेनेचे विमान धुळ्यात पाठवण्याची व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
आज हे विमान धुळ्याच्या गोंदुर विमानतळावर आले. यानंतर खा. डॉ. सुभाष भामरे यांना या विमानाने मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. यावेळी खा भामरे यांच्या पत्नी डॉ बिना भामरे, मुलगा डॉ राम भामरे भाऊ सुरेश पाटील यांच्यासह डॉ चारुदत्त शिंदे , गजेंद्र अंपळकर, राजेंद्र सोनार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व आप्तेष्ठ उपस्थित होते.
हेही वाचले का?