लक्ष्मी टेक डोंगराला वणवा  
Latest

कोल्‍हापूर : हसुर दुमालातील लक्ष्मी टेक डोंगराला वणवा; १० एकर फळबाग जळून खाक

निलेश पोतदार

राशिवडे ; पुढारी वृत्‍तसेवा हसुर दुमाला ता.करवीर येथील लक्ष्मी टेक गायरानाला अज्ञात व्यक्तिने आग लावली. या आगीत सुमारे दहा एकर क्षेत्रातील फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भीषण आगीत छोट्या पक्षांची घरटी, पक्षी, सरपटणारे प्राणी जळून खाक झाले. अज्ञात व्यक्तीने हा वणवा लावल्याची चर्चा गावात सुरू आहे.

हसुर येथे सुमारे ३८ एकर गायरान क्षेत्र आहे. यापैकी १७ ते १८ एकरमध्ये फळबाग करण्यात आली आहे. काल (गुरूवार) दुपारच्या दरम्यान लक्ष्मी टेक परिसराला वणवा लागल्याची माहीती पसरली. हा वनवा अज्ञात व्यक्तिने लावल्याची चर्चा आहे. या वनव्यामुळे  हसुर गावातील शेतकऱ्यांच्या गवताचे, फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच छोटे प्राणी, पक्षी त्यांची घरटी, त्‍यांचा निवारा, त्यांची पिल्ले या वनव्यात होरपळून निघाली आहेत. काही पिलांना लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला.

हा वणवा इतका भीषण होता की, वणवा विझवताना स्थानिक शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. मराठी शाळा रोड माळवाडी येथील काही युवक तसेच शेतकरी या सर्वांनी मिळून हा वनवा विझवला. मात्र या भीषण आगीत वृक्ष संपदा जळून खाक झाली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT