Uma Bharti : उमा भारती यांनी दारुच्या दुकानासमोर गायींना बांधले आणि… | पुढारी

Uma Bharti : उमा भारती यांनी दारुच्या दुकानासमोर गायींना बांधले आणि...

पुढारी ऑनलाइन डेस्क : दारू नको दूध प्या, अशा घोषणा देत मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी लोकांना दारूपासून दूर राहण्याचे आवाहन केले. उमा भारती Uma Bharti यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील ओरछा शहरातील एका दारूच्या दुकानासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी जनतेला दारू नको दूध प्या, असे आवाहन केले.

आंदोलन करताना उमा भारती Uma Bharti यांनी ओरछा शहरातील एका दारुच्या दुकानासमोर भटक्या गायींना बांधून त्यांना खाण्यासाठी चारा दिला. उमा भारती या दुकानासमोर आंदोलन करत आहे हे समजताच दुकानदाराने दुकानाचे शटर लावून घेतले. लोकांनी दारु पिऊ नये म्हणून यापूर्वीही अनेक वेळा आंदोलन केले आहे. गेल्या वर्षी याच दारुच्या दुकानासमोर त्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी दुकानात शेण फेकले होते. त्यामुळे उमा भारती यांना गुरुवारी आंदोलन करत आहे, हे पाहता क्षणीच दुकानदाराने दुकानाचे शटर लावून घेतले. तर मार्च 2022 मध्ये उमा भारती यांनी एका दारुच्या दुकानावर दगडफेक केली होती.

माजी मुख्यमंत्री उमा भारती Uma Bharti मद्यपान विरोधातील मोहिमेत नेतृत्व करत असताना म्हणाल्या की, सरकारने लोकांच्या दारू पिण्याच्या सवयीवर पैसा कमावू नये. त्या असेही म्हणाल्या, मद्यपानाच्या या समस्येसाठी काही प्रमाणात त्या स्वतः देखील जबाबदार आहे. यावेळी त्यांनी 2003 मध्य आपण भाजपसाठी मते मागितली होती आणि तेव्हापासून 2018 ते 2020 चा 15 महिन्यांचा कालावधी वगळता मध्यप्रदेशात भाजपच सत्तेवर आहे. 2018 ते 20 च्या दरम्यान मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार होते.

महत्वपूर्ण म्हणजे ज्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती Uma Bharti याआधी राज्यात पूर्णपणे दारु बंदी लागू करण्याची मागणी करत होत्या. त्याच आता वर्षअखेरीस येणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर निर्बंध लावण्याची आणि नियमावली करण्याची मागणी करत आहे.

आयएमएफएल या भारतीय बनावटीची विदेशी दारू विकणा-या सेल्समन रामपालने पीटीआयला सांगितले की, गेल्या वेळी उमा भारती यांनी दुकानात शेणाच्या गोव-या फेकल्या होत्या. त्यामुळे आम्ही दुकानाचे शटर लावून घेतले. तसेच तो असेही म्हणाला की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान एक धाडसी नेते आहेत. त्यांनी विद्यमान उत्पादन शुल्क धोरणात काही त्रुटी असल्याचे मान्य केले. तसेच योगगुरू रामदेव यांच्याशी सल्लामसलत करून नवीन मसुदा तयार करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, राज्याच्या राजधानीत, चौहान यांनी उमा भारती Uma Bharti यांच्या विधानांवर आणि तिच्या दारूविरोधी मोहिमेवर पत्रकारांचे प्रश्न टाळले. मध्य प्रदेश सरकार लवकरच नवीन अबकारी धोरण आणणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना चौहान म्हणाले होते की नवीन उत्पादन शुल्क धोरण मद्यपानास परावृत्त करेल.

हे ही वाचा :

MLC Election News : इलाखा तुम्हारा…धमाका हमारा; सुषमा अंधारेंचा भाजपला डिवचलं

Anurita Jha : Aashram 3 च्या ‘या’ अभिनेत्रीने दिले होते बिनधास्त इंटिमेट सीन

Back to top button