Latest

कुकडी प्रकल्पातून 1 मार्चपासून 38 दिवसांसाठी आवर्तन

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्पातून 1 मार्चपासून 38 दिवसांसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली. आ. बेनके यांनी सांगितले की, पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लगार समितीची बैठक पुणे येथे झाली. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, जलसंपदा विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत पिंपळगाव जोगा धरण्याच्या पाण्याचे आवर्तन दि. 26 तारखेपासून सुरु केले जाणार असून ते 40 दिवसांचे असणार आहे.

जुन्नर तालुक्यातील जनतेला पाऊस पडेपर्यत पाण्याची कमतरता पडणार नाही असे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि यंदाचा कडक उन्हाळा असल्याने व पाण्याची कमतरता असल्याने सगळ्यांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले आहे. दरम्यान यंदाचा कडक उन्हाळा व मागील वर्षी कमी झालेला पाऊस यामुळे यंदा कुकडी प्रकल्पात पाणी कमी असून पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. त्यातच उन्हाळ्याचे आवर्तन पूर्व भागातील सात तालुक्यात द्यावे लागणार असल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी संकटात येण्याची शक्यता आहे.

सध्या कुकडी प्रकल्पात 15.930 टीएमसी म्हणजेच 53.65 टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. सध्याचा पाणीसाठा विचारात घेता उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची देखील चणचण भासणार आहे. त्यामुळे पूर्व भागातील कर्जत, करमाळा, शिरूर, पारनेर शिगोंदा तसेच जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील जनतेला पाणी फारच जपून वापरावे लागणार आहे. जलसंपदा विभाग कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1 चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर म्हणाले की, कुकडी सध्या पाण्याचा साठा अवघा 53.65 % इतकाच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पूर्व तालुक्यासाठी एक अवर्तन पाण्याचे सोडले जाऊ शकते. चार महिने जपून वापरावे लागणार आहे. उन्हामुळे होणार पाण्याचे होणार आहे. कालव्यांची दुर्दशा पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऊन व पाणी गळतीचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो.

कुकडी प्रकल्पातील कालव्यांची दुर्दशामोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अस्तरीकरण निघालेले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ही पाण्याची गळती रोखायची असेल तर कालव्याचं अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. परंतु यंदाच्या वर्षी कालव्यांची दुरुस्ती होण्याची सुताराम शक्यता नाही.

धरण निहाय आज अखेर असलेला पाणीसाठा

  • डिंभे 65.14 टक्के (8.139 टीएमसी),
  • येडगाव 59.74%(1.61 टीएमसी ), माणिकडोह 38.83 टक्के( 3.95 टिएमसी),
  • वडज 64.68 टक्के (0.760 टिएमसी),
  • पिंपळगाव जोगा 49.12 टक्के (1.191 टीएमसी).

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT