‘लावणी महाराष्ट्राची’, नवा कार्यक्रम उद्यापासून भेटीला | पुढारी

‘लावणी महाराष्ट्राची’, नवा कार्यक्रम उद्यापासून भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘सन मराठी’ वर वाजणार ढोलकीची थाप आणि ऐकू येणार घुंगराचा चाळ; २५ फेब्रुवारीपासून ‘लावणी महाराष्ट्राची हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आहे. २५ फेब्रुवारीपासून दर रविवारी रात्री ९ वाजता सन मराठीवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

नुकतीच, ‘लावणी महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाची झलक सोशल मीडियावर दाखवण्यात आली. या कार्यक्रमात मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय आणि कलागुण संपन्न अशा अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे, सोनाली कुलकर्णी, स्नेहलता वसईकर, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी यांच्या सुरेख सादरीकरणामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढणार हे नक्की. निवेदन अभिनेते दिगंबर नाईक करणार आहेत.

लावणी महाराष्ट्राची

Back to top button