kiran mane 
Latest

‘तोपर्यंत किरण माने फेमस झाला ना राव!’ नवी पोस्ट व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढल्याच्या विषयावरून गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडालीय.  किरण माने यांनी फेसबूकवर एक कार्टून फोटो पोस्ट केलीय. भलीमोठी पोस्ट लिहून माने यांनी आपली बाजू स्पष्ट मांडलीय. एखाद्या कलाकाराला कशाप्रकारे बदनाम केलं जातंय. त्याच्याविरोधात कशाप्रकारे षड्यंत्र रचलं जातयं. त्याचबरोबर, रचलेला कटदेखील कशाप्रकारे अयशस्वी होत आहे. याविषयीची एक मोठी पोस्ट त्यांनी आपल्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर लिहिली आहे.

आधी वाहिनीने काढलं. नंतर महिलांशी गैरवर्तन आणि आता टॉन्टिंग. या सर्व प्रकारात माने यांना गुंतवलं गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काही महिला कलाकारांनीही त्यांना पाठिंबा दिलाय. 'मुलगी झाली हो' मधील चार महिला टीव्ही कलाकारांनी सांगितलं की, किरण माने हा माणूस म्हणून अतिशय भला आहे. काडीचंही गैरवर्तन नाही. आमच्यावर मुलीसारखी माया करतात ते.

कट रचला जातोय

मानेंना मालिकेतून काढून टाकण्यामागे तीन कारणं पुढे आली आहेत. आधी व्यावसायिक कारणं, नंतर महिलांशी गैरवर्तन, आणि नंतर टॉन्टिंग. प्रॉडक्शन हाऊसने आपल्याविरोधात कटकारस्थान करायला सुरुवात केल्याचं त्यांनी म्हटलंय. माझी बाजू त्यांनी कधीही ऐकून घेतली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

याआधी बोलताना माने म्हणाले होते की, शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. मी आतापर्यंत मालिकेतलं काम चोख करत आलोय. मी कोणतीही तक्रार न करता गेले वर्षभर काम केलं. पण, मी सोशल मीडियावर राजकीय विचार मांडतो म्हणून मला मालिकेतून काढलं गेल्याचा आरोप त्यांनी केला हाेता. सर्वांना विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. एखादा व्यक्ती स्वत:ची राजकीय भूमिका मांडत असेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीने काम गमावण्याची वेळ येत असेल तर ते योग्य नाही, असेही त्‍यांनी म्‍हटलं हाेतं.

अभिनेत्री अनिता दातेने केले किरण मानेंचे समर्थन

माझ्या नवऱ्याची बायको फेम राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते हिने मानेंच्या वादात उडी घेतली आहे. अनिका दाते म्हणाली की, मत मंजलं म्हणून काम गमावण्याची वेळ येऊ नये.

कोणत्याही अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला पूर्वकल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता ठोस कारणाविना कामवरून काढणं चुकीचं आहे. अशा निर्मिती संस्था तसेच वाहिनी यांनी त्या कलाकाराला कामावरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवलं पाहिजे. अशा व्यवस्थांचा मी निषेध करते, असे स्‍पष्‍ट करत अनिता दाते  हिने माने यांना समर्थन दिलं आहे.

हेही वाचलं का? 

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये मानेंनी काय म्हटलंय पाहा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT