लॉयन बाबत बिग अनाऊन्समेंट - पुढारी

लॉयन बाबत बिग अनाऊन्समेंट

पुढारी ऑनलाईन

शाहरूख खान ‘पठाण’सोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक अ‍ॅटलीकुमारसोबत ‘लॉयन’ या चित्रपटात काम करत आहे. आता या चित्रपटाबाबत 26 जानेवारीला शाहरूख मोठी अनाऊन्समेंट करू शकतो, अशी बातमी आहे. शाहरूख आणि निर्मात्यांची याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे निर्मात्यांसह आता अनेकांच्या नजरा या घोषणेकडे लागल्या आहेत. हा एक पॅन इंडिया अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे.

अ‍ॅटलीच्या ‘मर्सल’, ‘बिगिल’ या चित्रपटांप्रमाणे ‘लॉयन’मध्येही डबलरोल असून शाहरूख बाप आणि मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हरदेखील आहेत. शिवाय दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारादेखील या चित्रपटाचा भाग असू शकते. चित्रपटाची कहाणी ‘मनी हाईस्ट’वरून प्रेरित असून मुंबई आणि पुण्यात चित्रपटाचे काही शूटिंग झाले आहे.

Back to top button