Latest

कमलप्रीत कौर : थाळी फेकमध्ये पोहचली सहाव्या स्थानावर

backup backup

भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौर अंतिम फेरीत आपला हात आजमावला. पहिल्या राऊंडमध्ये तिने सहाव्या स्थान पटावत अंतिम आठमध्ये स्थान मिळवले खरे पण, तिला पदकाला गवसणी घलाता आली नाही. पुढच्या तीन प्रयत्नातील दोन प्रयत्नात फाऊल झाला तर एका पर्यत्नात तिने ६१ मिटरच्या आसपासच थाळी फेक केली. त्यामुळे तिला सहाव्या स्थानावरच समाधान मानावे लागले.

कमलप्रीत कौरने पहिल्या फेरीत ६१.६१ मिटर थाळी फेकली. जाणकारांच्या मते तिने अंतिम फेरीची चांगली सुरुवात केली आहे. पण तिने दुसऱ्या फेरीत निराशा केली. तिचा दुसरा प्रयत्न फाऊल ठरला.

अंतिम फेरीत पावसाचा व्यत्यय

टोकियोच्या नॅशनल ऑलिम्पिक स्टेडियमवर पाऊस पडत असल्याने थाळीफेकपटू यांना थाळी फेकण्यात अडचणी येत होत्या. अनेक खेळाडूंच्या हातातून थाळी निसटून जाळीवर पडली. त्यामुळे फाऊल ठरला. एक खेळाडू तर पाय घसरून खाली पडली. त्यानंतर आयोजकांनी थाळीफेक अंतिम अंतिम फेरी काही काळ थांबवली.

ज्यावेळी पुन्हा अंतिम फेरीतील पहिला राऊंड सुरु झाला त्यावेळी ज्या खेळाडूंचा पावसामुळे फाऊल झाला होता त्यांना पुन्हा दुसरा प्रयत्न करण्याची संधी दिली. मात्र कमलप्रीत कौर हिचा दुसरा प्रयत्न पावसापूर्वी झाला होता. त्यामुळे तो फाऊलच धरण्यात आला.

कमलप्रीत कौर सहाव्या स्थानावर 

कमलप्रीत कौरला तिसरी आणि शेवटची संधी मिळाली. तिने हा संधीचे सोने करत ६३.७० मिटर थाळी फेकली. त्यामुळे ती ८ व्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर आली. तिने अंतिम फेरीतील अंतिम आठ खेळाडूंमध्ये जागा मिळवली. त्यामुळे तिला पुढचे अधिकचे तीन प्रयत्न मिळाले.

पण, या तीन प्रयत्नातील पहिला प्रयत्न फाऊल ठरला. तर दुसऱ्या प्रयत्नात कमलप्रीत कौर ६१. मिटर पर्यंतच पोहचली. त्यानंतर तिसरा प्रयत्नही फाऊल ठरल्याने तिला सहाव्या स्थानावरच समाधान मानावे लागले.

महिला थाळीफेक अंतिम फेरीत पहिल्या राऊंडमध्ये ६८.९८ मिटर थाळीफेक करणारी अमेरिकेची व्हालरे अलमान प्रथम स्थानावर राहिली. त्यानंतर कोणत्याही खेळाडूला याच्यापेक्षा चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अलमान सर्वणपदकाची मानकरी ठरली.

अंतिम फेरीत १२ थाळीफेकपटू पात्र झाले. पहिल्यांदा सर्व पात्र खेळाडूंना थाळीफेकीच्या तीन संधी देण्यात आल्या. त्यातील पहिल्या आठ खेळाडूंना शॉर्टलिस्ट करत त्यांना पुन्हा तीन संधी देण्यात आल्या.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : नेमबाज तेजस्विनी सावंतची खास मुलाखत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT