पुढारी ऑनलाईन डेस्क: पुरुष बॉक्सिंगमध्ये आज भारताच्या पदरी निराशाच पडली. उपांत्यपूर्व फेरीत सतीश कुमार याचा उझेबेकिस्तानचा जालोलोव बाखोदीर याने पराभव केला. सतीश कुमार पराभूत झाल्याने पुरुष बॉक्सिंगमधील पदकाची आशा संपुष्टात आली आहे.
बॉक्सिंगमध्ये ९१ किलोवरील गटामध्ये सतीश कुमारने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. याची लढत उझेबेकिस्तानच्या जालोलोव बाखोदीर याच्याशी होणार होती.
सतीशने पहिल्या राउंडची सुरुवात आक्रमक केली. मात्र जालोलोव याने आपला नैसर्गिक खेळ केला.
पहिल्या राउंडमध्ये सतीश पिछाडीवर गेला. तर दुसरा राउंडमध्येही बाजी मारत जालोलोवने 5-1 गुणांवर सामना आपल्या नावावर केला.
टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष बॉक्सिंगमध्ये भारताचे पाच खेळाडू होते.
मनीष कौशिक, विकास कृष्णन आणि आशीष कुमार हे पहिल्याच फेरीत बाद झाले होते.
अमित पंघाल हा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. उर्वरीत चौघेही ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्याने सतीशकुमारकडून मोठ्या अपेक्षा होत्या.
त्याचाही पराभव झाल्याने पुरुष बॉक्सिंग संघाकडून अपेक्षाभंग झाला आहे.
२०१६ रियो ऑलिम्पिकमध्येही पुरुष बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा पडली होती.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगमध्ये भारताचे पदक निश्चित झाले आहे.
उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लव्हलिन बोर्गोहेन हिने तैपईच्या निएन चिन चेनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
आता तिने उपांत्य फेरीत विजय मिळविण्यास भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा पल्लवित होतील.
यापूर्वी बॉक्सिंगमध्ये २००८ बिजिंग ऑलिम्पिकमधृये विजेंदर सिंग याने कास्य, २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमने कास्य पदक पटकावले होते.
आता लव्हलिनाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवत पदक निश्चित केले आहे. या विजयामुळे तिच्या पुढील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचलं का?